परागकण
Thursday, April 15, 2010
Friday, June 12, 2009
एक चित्र संवाद
ती: काय म्हणतिये मी? येतंय का लक्षात? तोंड फिरवून बसल्यानं काही फरक पडणार नाहिये.
ती: छी ... तुझ्याशी ना बोलण्यात काही एक अर्थ नाही.
तो: अगं पण .....
ती: एक अक्षर बोलू नकोस. काही एक ऐकायचं नाहीये मला.
तो: श्या .... काय कटकट आहे साला. जाऊ दे जातोच मी.
ती: गेलं वाटतं येडं. कुठे गेलं कुणास ठाऊक? जाऊ दे. जाऊन जाऊन जातोय कुठे? येईलच परत.
Friday, June 5, 2009
सहजमुक्त
अर्थ - परमार्थ
सगळ्या सगळ्यापासून मुक्तीसाठी
स्वतःकडे पाठ फिरवून मी वळलो
तशी तू सामोरी उभी
... हाती आरसा धरून.
नाहीच करू शकलो मी विरोध फारसा...
आणि मग तोच शरणागतीचा परिपाठ
... की सोपस्कार?
पुन्हा एकदा मी नव्याने सज्ज
त्याच झगड्यासाठी.
आणि तू ?
तू सर्वांहून पुन्हा अलिप्त.
सहजमुक्त !
Sunday, May 17, 2009
Monday, November 10, 2008
Saturday, November 1, 2008
आर न पार
आयुष्य
समुद्रासारखं.
आपण मात्र नेहमीच
उभे असतो किनार्यावर
अगदी घट्ट पाय रोवून
धृवालाही खुन्नस देत.
आणि मग
भरती-ओहोटीच्या वेळा येतात
ध्यानीमनी नसताना लाटा रोख बदलतात
पायाखालची वाळू ..... वाळूच ती शेवटी ...
सरकू लागते,
तेव्हा
आधार वाटतो
फक्त ... आकाशाचा.
धरावा का असा भरवसा?
आकाशाचा?
ज्याला न आर न पार स्वतःचाच?
ज्याची निळाई रंगते आपल्याच गहिर्या वेळच्या नजरेने
आणि ज्याची अथांगता मूळ धरते
आपल्याच पायाखालच्या सरकणार्या वाळूतून ...
धरावा का मग भरवसा?
अशा आकाशाचा?
जे न आर न पार?
Monday, October 27, 2008
Subscribe to:
Posts (Atom)
