Friday, June 12, 2009

एक चित्र संवाद


ती: काय म्हणतिये मी? येतंय का लक्षात? तोंड फिरवून बसल्यानं काही फरक पडणार नाहिये.ती: छी ... तुझ्याशी ना बोलण्यात काही एक अर्थ नाही.


तो: अगं पण .....
ती: एक अक्षर बोलू नकोस. काही एक ऐकायचं नाहीये मला.


तो: श्या .... काय कटकट आहे साला. जाऊ दे जातोच मी.


ती: गेलं वाटतं येडं. कुठे गेलं कुणास ठाऊक? जाऊ दे. जाऊन जाऊन जातोय कुठे? येईलच परत.

Friday, June 5, 2009

सहजमुक्त

अर्थ - परमार्थ
सगळ्या सगळ्यापासून मुक्तीसाठी
स्वतःकडे पाठ फिरवून मी वळलो
तशी तू सामोरी उभी
... हाती आरसा धरून.
नाहीच करू शकलो मी विरोध फारसा...
आणि मग तोच शरणागतीचा परिपाठ
... की सोपस्कार?

पुन्हा एकदा मी नव्याने सज्ज
त्याच झगड्यासाठी.

आणि तू ?
तू सर्वांहून पुन्हा अलिप्त.
सहजमुक्त !